1 Samuel 16

1मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले की, मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल. ईशाय बेथलेहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे.

2तेव्हा शमुवेल म्हणाला, मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील. मग परमेश्वर म्हणाला, एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण. 3त्या यज्ञास इशायला बोलाव. नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन, आणि जो मी तुला सांगेन त्याला माझ्यासाठी अभिषेक कर.

4तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुवेलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीतभीत त्याला भेटायास आले व त्यांना त्याला विचारले, तुम्ही शांतीनेच आला आहात ना? 5त्याने म्हटले, शांतीने; मी परमेश्वराला यज्ञ आर्पण करायास आलो आहे. मजबरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्धा व्हा. त्याने ईशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले.

6ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे. 7परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्याला नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरुप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.

8मग ईशायाने आबीनादाबाला बोलाविले आणि त्याला शामुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, यालाही परमेश्वराने निवडले नाही. 9मग ईशायने शाम्मास पुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले. ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही. 10असे ईशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेला पुढे चालविले. परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.

11तेव्हा शमुवेलाने ईशायला म्हटले, तुझे सर्व पुत्र आले आहेत का? मग तो म्हणाला, आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेढंरे राखीत आहे. तेव्हा शमुवेलाने त्याला म्हटले. त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही. 12मग त्याने त्याला बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे.

13मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्याला अभिषेक केला. त्या दिवसापासून देवाचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.

14मग देवाच्या आत्म्याने शौलास सोडिले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्याला त्रास करू लागला. 15तेव्हा शौलाचे चाकर त्याला म्हणाले, आता पहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हाला त्रास देतो आहे. 16आपण विणा वाजविणारा निपुण असा एक माणूस शोधू. तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्यासमोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा दुष्ट आत्मा तुम्हाला त्रास देऊ लागेल, तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुमाहाला बरे वाटेल.

17मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, जा, चांगला वाजविणारा माणूस शोधून माझ्याकडे आणा. 18मग चाकरातून एका तरूणाने उत्तर दिले की, पहा वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ माणूस व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे, तो ईशाय बेथेलहेमी ह्याचा पुत्र आहे. 19मग शौलाने ईशायजवळ दूत पाठवून म्हटले की, तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत असतो, त्याला मजपाशी पाठवावे.

20तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले. 21दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला.

22मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मी तुला विनंती करतो की, आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे; कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे. मग जेव्हाकेव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्याला सोडून जाई.

23

Copyright information for MarULB